यशस्वीरित्या गुंतवणूकी बद्दल आपल्याला आवश्यक असलेली ७ महत्वाच्या गोष्टी, फ़क्त दहा मिनिटांत !

Samruddhi Safal Nivesh 2020



यशस्वीरित्या गुंतवणूकी बद्दल आपल्याला आवश्यक असलेली ७ महत्वाच्या गोष्टी,फ़क्त दहा मिनिटांत ! 

गेले कितेक दिवस लॉकडाउन मधे घरी बसून आहोत. लॉकडाउन २ पासून नविन पर्व चालू झाले पण कोरोना काय बरा होण्याचा नाव घेत नाही, आता ह्या कोरोनाने तर चालिशि गाठली. महाभारत, रामायण, श्रीकृष्ण आणि आंखिन काय तर तुला पहते रे, फू बाई फू, हव्वा येऊ दया  ! आता रिपीट टेलीकास्ट सुधा पाठ झाली. न्यूज़ चैनल्स तर लावायची भीति वाटते - फक्त ब्रेकिंग न्यूज़ - आज पुन्हा कोरोनाचे नविन संशयित सापडले !     

माहामारी कशी संपेल ? जर तुम्ही अशेच घरातून बाहेर पडत असाल !

खरच जर घरातून बाहेरच कोणी पडले नाही मग कोरोना घरात येतोय तरी कुठून, हा संशयित कोण ? कुठल्या जातीतला ? ना त्याला गांव ? ना त्याला शहर ? अरे हा आलाच कुठून ज्याने आमच्या संरक्षण कर्त्या पुलिस आणि जवनान मधे सुद्धा भीति भरली! ह्या अवघ्या महाराष्ट्रने अवकाळी पाऊस पाहिला, भयंकर ओला दुष्काल पाहिला , तरीपण खंबीरपने हा मानुस ताठ मानेने उभा राहिला ! 
चाकारमाणी आपल्या गावाकडच्या वाटेवर लक्ष लावून बसलाय - त्यावर सरकारने लॉकडाउन ३ ची घोषणा झाली. परप्रांतीय आपापल्य गावी पायी जाऊ लागले. सर्वीकडे हा-हाकर माजला. सर्व कैसे संभ्रमित झाले. 

न्यूज़ बंध झाली आणि चालू झाले " शेयर मार्केट "- गुंतवणुकीसाठी धाडसी पर्याय! ऐकूणच खुप बर वाटले, पण खरच ही वेळ आहे का गुंतवणुकीची ! नुकसान तर होणार नाही ? कोण त्या मार्केट मधील चढ़ -उतार पाहत बसेल ! समजले तर ठीक नाहीतर नुकसान सहन करायची हिंमत आनु तरी कुठून !

काय होईल जर ह्या महामारीमध्ये आपन मार्केटमध्ये निवेश करू ?

गेल्या महिन्यात बाजराने नीचाँक गाठाला, पण आशा  वेळी  शेयर मार्केट गुंतवणूक करने कितपत योग्य आहे.  गुंतवणूक पर्याय म्हणून फिक्स्ड डिपोसिट, रिकरिंग डिपोसिट आणि पोस्ट सोबत म्यूच्यूअल फंड, शेयर मार्केट, सरकारी आणि खासगी बॉण्ड्स ह्यावरती सुद्धा लक्ष दिले पाहिजे. एकाच गुंतवणूकीच्या पर्याय निवडणे हे चुकीचे आहे, नाहीतर यस बैंक मधील गुंतवणूक दारांसारखी हालत होईल. मला आठवते - संचयनी, ट्विंकल सारख्या मोठ्या कंपन्या रातोरात गायब झाल्या.  म्हणून गुंतवणुकीचे जास्तीत जास्त पर्याय निवडणे गरजेचे आहे.  आजची संकल्पना ही सरसरी व्यक्तींसाठी आहे - ज्यांना दीर्घ मुदतीसाठी शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक करुण नफा मिळवायचा आहे

खऱच विश्वास बसत नाही ना !

आता लॉकडाउन मधे आनखिन किती दिवस घरी बसून काम करायचे, पगार होईल ह्याची अपेक्षा नाही, सर्व उद्योगधंदे बंद पडलेत, सोन्याचा भाव पनाशी पोचला. हयात आधीच गरीबिने कंब्बर मोडली आणि महागाइने तर उच्चांक गाठला.  बेरोजगारीमुळे कर्जाचे हफ्ते थांबले तरीसुद्धा मी तुम्हाला गुंतवणुकीसाठी शेयर मार्केट मधील ७ प्रभावी गोष्टी सांगणार आहे. ज्याचे योग्य पालन केले तर तुम्ही सुद्धा शेयर मार्केट मध्ये यशस्वीरित्या खरेदी -विक्री करू शकता.

शेयर बाजारात उतरण्यपूर्वी काही गोष्टींची अभ्यास करने महत्त्वाची आहे. CNBC आवाज, ZEE बिज़नेस आणि इकॉनोमिक टाइम्स सारखी पर्याय तुम्हाला बरीच माहिती देऊ शकतात. इक्विटी शेयर गुंतवणूकीमुळे तुम्ही राष्ट्राच्या किंवा जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊ शकता आणि अशाप्रकारे गुंतवणूक करून तुम्ही स्वतःची संपत्ति निर्माण करू शकता. 

कोरोनाची सद्यस्तिथि पाहता आपन काय करावे ?

कोरोनामुळे जगभरात पसरलेल्या मंदीवरून लवकरच चीन अमेरिकेचा ताबा घेईल, अशी भीती खुद्द अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनीच व्यक्त केलेली असताना आता भारतासाठी धोक्याची घंटा वाजु लागली आहे. चीनची केंद्रीय बँक पीपल्स बँक ऑफ चायनाने गृहकर्ज देणाऱ्या भारतातील खाजगी क्षेत्रातील दिग्गज कंपनी एचडीफसीचे मोठ्या प्रमाणावर शेयर विकत घेतले आहेत. यानंतर मोदी सरकार अचानक तत्काळ सतर्क झाले असून चीनमधे येणाऱ्या एफडीआयवर बंदी आणण्यात आली आहे. भारतीय कंपन्या चीनच्या ताब्यात न जाण्यासाठी चीनमधून येणाऱ्या गुंतवणुकीला परवानगी घ्यावी लागणार आहे

जर तुम्ही २००८ च्या ख़राब मर्केटमधे  गुंतवणूक केली असेल तर तुम्ही Warren Buffet आहात. आता ह्या संधीच सोन करुण घेण हे तुमच्या  हातात आहे

आता आपणच आहोत। .!
आपल्या जीवनाचे शिल्पकार। . . !

शेयर कसे खरेदी करावे हे तर तुमच्या गृहिणीला विचरा.  सामान्य घरातील गृहिणी कुठल्या वेळी, कुठल्या सीजन मधे कुठली भाजी व  फलभाजी घ्यावी आणि किती किराना कोणत्या क़ीमतीत घ्यावा ! हे त्यांना चांगलेच माहिती आहे. असच काही शेयर मार्केट आणि म्यूच्यूअल फंडच सुधा आहे

प्रा. भास्कर चंदनशिव यांची " लाल चिखल " ही कथा वाचली असेल. पण जेव्हा रस्त्या वरती रक्त ओसंडत असेल तेव्हा घाबरून न जाता खरेदी करण्यची संधि साधवी - म्हणजे जेव्हा शेयर मार्केट खुप ख़राब पद्धतीने कोसळले असेल तेव्हा योग्य निर्णय घेऊन चांगल्या कंपनी मधे गुंतवणूक करने. अगदी Sir Warren Buffet गुंतवणूक फॉर्म्युल्यासारखे. 

योग्य अभ्यास करून एक इच्छित शेयरची सूचि तयार करा. " शेयर अगदी तळाशी असताना खरेदी करने व त्यानंतर चांगल्या उच्च स्थितित असताना विकणे " - हे केवळ एक जादुगारच करू शकतो असं काही नाही. 
या व्यतिरिक्त, बाजारात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यपूर्वी आपल्याला बजाराची सध्याची अस्तिरतादेखील लक्षात ठेवली पाहिजे. शेअर मार्केट मध्ये खरेदी -विक्री  करताना काही गोष्टींची योग्य काळजी घेतली तर प्रत्येक जण नक्कीच पैसे कमावू शकतो. म्हणूनच आज आपण शेअर मार्केट ट्रेडिंग संदर्भातल्या 7 प्रभावी गोष्टी पाहणार आहोत ज्यांचे योग्य पालन केले तर तुम्ही सुद्धा शेअर मार्केट मध्ये यशस्वीरित्या खरेदी-विक्री करू शकता.

) तळ शोधण्याचा प्रयत्न करू नका !
एखाद्या कंपनीचा शेयर अगदी तळाशी आला - हे पाहून खरेदी करू नका
खरेदी -विक्री करण्यापूर्वी प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे तो म्हणजे मला कशासाठी खरेदी -विक्री करायची आहे ? जोपर्यंत ह्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर नसेल तर जरा थांबा !
ट्रेडिंग हा काही जुगार किंवा सट्टा नाही.
 तुम्ही निवडलेली कंपनी अगदी १ दिवसात किंवा महिन्यात नफा मिळवून देईल , याची शाश्वती नाही। महत्वाचे म्हणजे शेयर बाजाराकडून थोड्याच दिवसात दामदुप्पट ह्याची अपेक्षा ठेवू नकाम्हणून नियमित वाचनाची सवय करा.  कंपन्यांचा अभ्यास करण्यासाठी बाजारात खुप सारी पुस्तके उपलब्ध आहेत.  त्याच्या सोबत इंटरनेटच्या (इकोनॉमिक टाईम्स , MONEY कंट्रोल) माध्यमातून देखील माहिती मिळवा.
यशस्वी गुंतवणूकदार - त्यांच्या गुंतवणूक क्षमतेच्या बाबतीत स्वतःला ओळखून असतात आणि ते त्यांच्या मुलभुत संशोधन, विश्लेषण आणि गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करतात, ज्या उद्योगांची उत्पादने आणि त्यांच्या योजना त्यांना आवडतात त्यांच्यामधे ते गुंतवणूक करतात.

) आता निधिचे पुनरावलोकन करू नका !

कोविड़-१९ महमारीमध्ये घाबरून आहात - तुम्ही घेतलेल्या शेयरची कींमत कोसळली का ? गुंतवणूक पूर्णपणे तोट्यात आहे ! काय करू आनखिन वाट पाहु की सर्व शेयर विकून आहे ती रक्कम फिक्स्ड डिपोसिट मधे भरूमग जरा थांबा! घाबरून जाऊ नका ! उत्तार - चढाव तर होतच राहणार; शांत रहा ; अच्छे दिन आएंगे  हीच ती खरी वेळ आत्मपरीक्षणाची. शेयर मार्केटचे सखोल ज्ञान फक्त काय गुजराती - मारवाड़ी बांधवांकड़े आहे का माजा सर्व मराठी बांधवाना विनंती आहे की शेयर मार्केट गुंतवणुकीचे नविन साधन म्हणून पाहायशस्वी गुंतवणूकदार सतत योजना बदलताना दिसणार नाहीत.  ते भविष्यावर लक्ष केंद्रित करुण - कमित कमी खर्चात उत्तम संपत्ति निर्मिति कशी करता येईल याचा शोध घेतात. 

) गुंतवणुकीचे दीर्घकालीन उद्दिष्टे :- 

आतापर्यंत आपली ट्रेडिंगसाठी बरीच तयारी झाली आहे. आता वेळ आहे ती योग्य रणनीति धोरण ठरवून पैसे गुंतवण्याची. जैसेकि तुम्ही विचार करत असलेल्या गुंतवणुकीचा कालावधि किती आपल्याकडील रक्कम थोड़ी थोड़ी करत दीर्घ काळासाठी शेयर मार्केट आणि म्यूच्यूअल फण्ड मधे गुंतवणूक करने अधिक फायद्याचे आहे.  वर सांगितल्या एखादे रोप लावल्यानंतर त्याला वृक्ष वाढ़ीसाठी व फळ येण्यासाठी जसा काही कालावधी द्यावा लागतो त्याचप्रमाणे शेयर मार्केट मधे पण दिलेला योग्य वेळ भरगोस नफा मिळवून देऊ शकतो.

) जादू चक्रवाढ  लाभांशची :- 

" चक्रवाढ " हे जगातील सर्वात मोठे आश्चर्य आहे. ज्याला चक्रवाढ व्याजाची समज नाही तो सफल गुंतवणूकदार होऊच शकत नहीं चक्रवाढ व्याजाचे सूत्र अगदी साधे आणि सोपे आहे. जमा झालेल्या व्याजावर व्याज मिळत जाते आणि गुंतवणुकीची रक्कम झापाट्याने वाढते. ह्या प्रक्रियेला जर तुम्ही दीर्घअवधिची जोड़ मिळाली तर विश्वास बसणार नाही अशी फलप्राप्ती होते. हे जरी खुप सोपे वाटत असले तरी शिस्त आणि वेळ कालावधी येथे एक महत्त्वाची भूमिका निभवतात वरील रणनीतीच्या उपयोग करुन जगातील मुख्य गुंतवणूकदार Sir Warren Baffet यानी आपली गुंतवणूक वाढवली - खरच ना !

) शेयर मार्केट मनोविज्ञान :- 
काही गुंतवणूकदारांना वाटते की चांगल्या कंपनी गुंतवणुकीसाठी शोधण्याकरीता जादुई नजर लागते.  म्हणजे जेव्हा एखाद्या कंपनीच्या शेयर वाढू लागण्याच्या अगोदर आपन खरेदी करने.  यशस्वी गुंतवणूकदार अतिशय सायंमी असतात.  ते नेहमी त्यांची उद्दिष्टे आणि भावना कधीच एकत्र आनत नाहीत.  बाजारातील नफा तोटया मुळे गुंतवणुकीवर परिणाम होऊ न देणे अशी विलक्षण क्षमता त्यांच्यात असते.  संयम जर नसेल तर तुम्ही निवडलेल्या योग्य कंपनीच्या शेयर सुद्धा तुम्हाला योग्य नफा मिळवून देऊ शकणार नाही, तुमची रणनीति जर योग्य असेल तरच फायदा होईल आणि जरी नुकसान झालेच तरी त्याचेही प्रमाण तुम्हाला कण्ट्रोलमधे ठेवता येईल. 

 शेयर मार्केट सूंदर आहे पण संस्मरणीय व्हायला माणसंच लागतात !!

) आपल्याकडे थोड़े जास्त पैसे आहेत ना? तरच गुंतवणूक करा !
शेयर मार्केटचा जास्तीत जास्त अभ्यास तुमची निर्णयक्षमता वाढविण्यास मदत करते परंतु एक गोष्ट इथे लक्षात घ्यायला पाहिजे ती म्हणजे किमान ६ ते ७ महीने तुमचे घरखर्च चालेल एवढी रक्कम जमा झाल्यानंतरच तुम्ही शेयर मार्केट मधे गुंतवणूक करा. आभाळच फाटल तर ठिगाळ लवायचे तरी कुठे ! स्वतःला शेयर मार्केट गुरु समजण्याची कधीही चूक करू नका. जरी तुम्हाला इतरांपेक्षा थोड़ी जास्त माहिती असली तरी लगेचच खरेदी-विक्री करू नका. आतापर्यंत हेच सिद्ध झाले आहे की शेयर मार्केट म्हणजेच संपत्ती निर्माण करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, पण त्याच मालमत्तेच्या वर्गाने कधी कधी प्रचंड संपत्तीचा विनाशही पाहिला आहे


)मोठ्या प्रमाणात एकाच वेळी खरेदी करने टाळा :-

शेयर मार्केट मध्ये यशस्वी होण्यासाठी पुढची आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मोठ्या प्रमाणात खरेदी करणे. मला सांगा बजारभावामधील चढ़-उतार अगदी परफेक्ट ओळखू शकलय का कोणी ? जर समजा आज निफ़्टी ९३०० वरती ट्रेड करते आहे आणि तुम्ही रिलायंस कंपनी मधे १५०० रूपये वरती गुंतवणूक करत आहत  - आता मला सांगा महामारी काही केल्या जगातून निघायच नाव नाही आणि खरच कधी बरा होईल महित नाही। अजुन मार्केट जर का कोसळले तर काय कराल
म्हणून सांगतोय की सर्व रक्कम एकदाच आणि एकाच शेयर मधे किंवा एकाच सेक्टर मधे खरीदारी करू नका.  भविष्यात अफ़वाना बळी पडु नका. थोड़ी थोड़ी गुंतवणूकीमुळे शेयर मार्केट मधील जोखिमा पासून सावध राहु. म्यूच्यूअल फंड आणि शेयर मार्केट मधील थोड़ी थोड़ी गुंतवणूकीमुळे तुम्ही ख़राब मार्केट मधेहि तुम्ही चांगली गुंतवणूक करुन चांगली संपत्ति जमा करू शकता.

लॉकडाउन मधील आर्थिक घडामोडी :-
1) रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेडमधे एक मोठी गुंतवणूक झाली "विस्टा इक्विटी "पार्टनर या USA मधील इक्विटी इन्वेस्टमेंट फंडने गेल्या आठवड्यात रुपये ११३६७ /- कोटींची गुंतवणूक करुन २.३२ % स्टेक खरेदी केला. ही आशियामधील पहिली डायरेक्ट इन्वेस्टमेंट आहे.

2) यूरोपियन यूनियनने गेल्या काही दिवसात १००० टन पॅरेसिटेमॉल या औषधाची मागणी झाली. तसेच आपल्याला अंदाजे ८०० टन दरमहा या औषधाची गरज आहे असे सांगितले. त्यामुळे हे औषध बनवणाऱ्या GSK फार्मा, अल्बर्ट डेव्हिड, DR. REDDY'S LAB, IOL Chemicals and Pharmaceuticals Ltd., ग्रेनुअल्स या कंपन्यांच्या शेयर मधे तेजी पहायला मिळाली.

3) CHINA आणि  AMERICA (USA) यांच्यात पुन्हा एकदा TARIFF WAR  सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेटल क्षेत्रात मंदी आली.

4) क्रूड स्वस्त झाल्यामुळे जगातील बहुतेक देश आपल्याकडील स्टोरेज क्षमता शाक्य तितकी भरून घेत आहेत. भारतनेसुधा २.५ टन कोटि क्रूड खरेदी करुण त्याचा साठा केला आहे.

5) PFIZER’या कंपनीने आपली कोरोनासाठी लस तयार करण्याची मोहिम शेवटच्या काही टप्प्यात आहे.

6) लॉकडाउन ३ पॉलिसीच्या अंतर्गत मद्य विक्रेते दुकाने उघडायला काही अटींवर सरकारने परवानगी दिली. या बातमीमुळे GM ब्रुअरीज, राडीको खेतान, युनायटेड स्पिरीटज या शेयर मधे तेजी पहायला मिळाली.

7) ABBOTT लॅब भारतात रॅपीड़ एंटीबॉडी टेस्ट कीट लॉन्च केले.

    आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुपये २० लाख कोटीचे (जीडीपीच्या १०% रक्कम) "आत्मनिर्भर भारत अभियान" पैकेज घोषणा केली. या पॅकेजची सविस्तर घोषणा १३ मे २०२० पासून अर्थमंत्री निर्मला सीतारामण जाहिर करतील. त्यामुळे थकलेल्या मार्केटला थोड़ीशी गति मिळेल. भारतातील कोरोनाशी लढ़ा यशस्वी करताना प्रगतीचा मार्ग अवलंबला पाहिजे असा संदेश दिला.लॉकडाउन ४ ची सरकार तर्फे घोषणा लवकरच केली जाईल.१८ मे २०२० पर्यंत लॉकडाउनची मार्ग दर्शक तत्त्वे सरकार जाहिर करेल असे त्यांनी सांगितले.
आपन मार्केट मध्ये व्यवहार करत असाल तर सावधानतेने करा.

BSE सेंसेक्स  निर्देशांक
३१,३७१ (-१९०)
NSE निर्देशांक (निफ्टी)
,१९६ (-४२)
Bank निफ़्टी
१८,८६२ (-८७)

तू चाल पुढ तुला रे गड्या भीति कशाची !

तर माजा मराठी बांधवांनो हे होते काही टप्पे जे तुम्हाला शेयर मार्केट मध्ये यशस्वी करण्यासाठी पार करावे लागतील.

वरील कोणती रणनीति तुमच्यासाठी योग्य आहे ? महामारी आणि लॉकडाउन मध्ये गुंतवणूकदारांनी कशी गुंतवणूक केली पाहिजे ? तुमच्या सर्व प्रश्नांची माझ्या लेखामाधुन पूर्णपणे उत्तर सापडली असतील. तर माझ्या सर्व मराठी बांधवांनो हे होते, ७ महत्त्वाचे टिप्स ज्या तुम्ही गुंतवणूक करताना असाधारण नफा मिळवून देईल.

आता तुम्ही like करा, Share करा आणि अवघ्या माराष्ट्रापर्यँत पोहोचवा। नव-नविन लेख सर्वात आधी मिळवण्यासाठी सर्वात आधी ब्लॉग subscribe करा आणि Facebook पेज लाइक करा

शेयर मार्केट मधील चांगल्या लाभांसाठी चांगल्या आर्थिक सल्लागारला भेटून तुमची आर्थिक उद्दिष्टे निश्चित करा आणि योग्य दिशेने गुंतवणुकीला सुरुवात करा.

जय हिंद जय महाराष्ट्र !
जय शिवराय 




Previous
Next Post »